अकरावी प्रवेशासाठी आता आणखी एक संधी.. कसा घ्याल लाभ ? वाचा

अकरावी प्रवेशासाठी आता आणखी एक संधी.. कसा घ्याल लाभ ? वाचा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात अकरावीतील ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या सात फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत. पण, त्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेला नाही, त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. मुंबईतील शिक्षक उपसंचालक याबाबतीत एक मत्त्वाचा निर्णय घेतलाय.  

या नव्या निर्णयान्वये आता मंगळवार (ता. 15) ते गुरुवार (ता. 17) या कालावधीत सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. 

यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया मागील वर्षीच्या तुलनेत आठ दिवस उशिराने सुरू झाली. ऑक्‍टोबरच्या अंतिम दिवसापर्यंत ही प्रवेशप्रक्रिया सुरू होती. या काळात तीन नियमित, एक विशेष आणि तीन प्रथम प्राधान्य अशा सात फेऱ्या पूर्ण झाल्या. त्यानंतरही ATKT चे अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ऐन परीक्षेच्या काळात आठव्या प्रवेशफेरीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

या वेळापत्रकानुसार, आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात अकरावीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना 15 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत प्रत्यक्ष शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सोबत कागदपत्रे घेऊन यावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.  

WebTitle : marathi news one more change for those who did not get admission in eleventh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com