चक्क रस्त्यावर कांदा-बटाटा विक्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

तुर्भे - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर बाजार समिती, वाहतूक पोलिस व महापालिकेच्या आशीर्वादाने कांदा-बटाट्याची बेकायदा विक्री राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होते. ही मंडळी पालिकेच्या पदपथाचा वापर गोदामाप्रमाणे करत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होते. याच्याविरोधात कारवाई केली जात नसल्याने व्यापाऱ्यांमध्येही नाराजी आहे.

मुंबई बाजार समिती आवारामध्ये अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवनदरम्यान रोज वाहतूक कोंडी होत आहे. याला भाजी व फळ मार्केटच्या बाहेरील फेरीवाले व कांदा-बटाट्याची बेकायदा विक्री कारणीभूत ठरत आहे. भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित मार्केटमध्ये २६ व्यापारी कांदा-बटाट्याची विक्री करतात. पादचाऱ्यांसाठी बांधलेल्या पदपथावर गोणी ठेवल्या जातात. यामुळे पदपथ खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. रोज सकाळी ८ ते ११ पर्यंत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याशिवाय या मार्गावर स्वच्छता राखली जात नाही. येथे कारवाई केली जात नसल्याने काही नागरिकांनी एपीएमसी वाहतूक चौकीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांविषयी पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडे आणि महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र यावर पालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी तेथे तुर्भे विभाग कार्यालय कारवाई करील, असे सांगितले होते. याबाबत अतिक्रमणविरोधी प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात यांना विचारले असता त्यांनी संगितले की, आम्ही रोजच कारवाई करतो. दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मालही जप्त केला होता.

Web Title: marathi news onion Potato mumbai