'10 रुपयांत सकस आहार'; मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी

'10 रुपयांत सकस आहार'; मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी

मुंबई, ता. 8 :  भाजप - शिवसेना युती सरकारच्या काळात 1 रुपयांत झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले होते, त्याच धर्तीवर आता गरीब आणि कामगार वर्गासाठी शिवसेना 10 रुपयांत सकस आहार केंद्र स्थापन करून पुन्हा एकदा लोकांची मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तसे बॅनर शिवसेनेने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी जागोजागी लावले आहेत. 

अवघ्या दोन आठवड्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने ही घोषणा केली आहे. याचा फायदा शिवसेनेला निवडणुकीत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुंबईच्या केईम हॉस्पिटलसमोर तसेच भवन्स कॉलेज समोरील झुणका भाकर केंद्र कायदेशीरबाबी पूर्ण न केल्यामुळे जमीनदोस्त करण्यात आले होते.त्यानंतर शिवसेनेला झुणका भाकर केंद्रांना अन्नदाता केंद्र म्हणून घोषित करावे लागले.

तामिळनाडूमध्ये अम्मा कँन्टीनचा प्रयोग जयललिता यांनी यशस्वीपणे राबवला होता. अम्मा कँन्टीनच्या माध्यमातून माफक दरात गरिबांना जेवण उपलब्ध करून देण्यात आले होते. याचा फायदा जयललिता यांना निवडणुकीत मोठया प्रमाणात झाला. आता शिवसेना देखील 10 रुपयांत सकस आहार केंद्र स्थापन करणार आहे. हीच ती वेळ ही प्रचाराची टॅग लाईन घेऊन शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. 

विधनसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली जातात. मात्र केवळ मतदारांना भुरळ घालण्यासाठी या घोषणा नसाव्यात एवढीच माफक अपेक्षा.

WebTitle : marathi news shivsena to offer healthy food at 10 rs in mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com