ठाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुभाष पवारांची निवड

मुरलीधर दळवी 
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुरबाड (ठाणे) : ठाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी मुरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुभाष पवार यांची शिवसेनेच्या पाठींब्याने निवड झाली. त्यांच्या निवडीने युवा नेतृत्वाचा उदय झाला आहे. मुरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ त्यामुळे दूर होणार आहे. 

मुरबाड (ठाणे) जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी सोमवारी (ता. 15) मुरबाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुभाष पवार यांची शिवसेनेच्या मदतीने निवड झाल्याने युवा नेतृत्वाचा उदय झाला आहे. सुभाष पवार हे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आहेत ते मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून विजयी झाले आहेत. जिल्हा पातळीवर सत्तेत मोठे पद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

गेल्या काही महिन्यापासून भाजपला मुरबाड तालुक्यात शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युती करण्याबाबत सुभाष पवार आग्रही होते. सुरुवातीला शेतकरी सहकारी संघ, नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर ग्रामपंचायत व शेवटी ठाणे जिल्हा परिषद व मुरबाड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. त्यावेळी मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शिवसेनेचा एकमेव सदस्य असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला उपसभापती पद दिले होते. त्याचा फायदा आता सुभाष पवार यांना ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळण्यात झाला. माजी आमदार गोटीराम पवार आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ आता दूर होईल असे चित्र आहे.

Web Title: Marathi news thane news thane jilha parishad selected subhash pawar