Vidhan Sabha 2019 : सुक्षिशीत ठाण्यातले बहुसंख्य उमेदवार अल्पशिक्षीत

रामनाथ दवणे
Thursday, 10 October 2019

 • सुक्षिशीत ठाण्यातले बहुसंख्य उमेदवार अल्पशिक्षीत
 • ठाण्यातील बहुसंख्य उमेदवार जेमतेम दहावी पास
 • बहुसंख्य आमदार दहावी पास असण्याची शक्यता

तब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ठाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत पोहोचणार आहेत. एक नजर टाकूयात ठाण्यातले कोणते उमेदवार अल्पशिक्षीत आहेत.

 • कोपरी पाचपाखाडीतून शिवसेनेचे उमेदवार आणि ठाण्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे अकरावी पर्यंत शिकलेत.
 • ऐरोलीतून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले नवी मुंबईतले बडे नेते गणेश नाईक हे सुद्धा अकरावी पास आहेत.
 • ओवळा माजिवड्यातून शिवसेनेतर्फे उमेदवार असलेले प्रताप सरनाईक हे दहावी पास आहेत.
 • ठाणे शहर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणारे मनसेचे अविनाश जाधव हे सुद्धा दहावी पासच आहेत.
 • मुरबाड मतदारसंघातले भाजपचे उमेदवार किसन कथोरे अकरावी, तर उल्हासनगर मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती कलानी या बारावी पास आहेत.
 • मनसेचे प्रमोद पाटील, महेश कदम,भाजपचे कुमार आयलानी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांनीही दहावीपर्यंतच शिक्षण घेतलंय.
 • विशेष म्हणजे भाजपच्या मंदा म्हात्रे,नरेंद्र मेहता, गणपत गायकवाड, आणि शांताराम मोरे या उमेदवारांना तर दहावीची परिक्षाही पास करता आलेली नाही.
 • निवडणूक आयोगाकडे सादर केलल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. मात्र याच ठाण्यातून डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, डॉ. बालाजी किणीकर, प्रकाश भोईर, प्रमोद हिंदुराव किंवा पांडुरंग बरोरा यांच्यासारखे उच्चशिक्षीत उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही बाब जरी खरी असली तरीही आगामी विधानसभेत ठाण्याचं प्रतिनिधित्व करणारे बहुसंख्य आमदार हे अल्पशिक्षीत असणार हे निश्चित.
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vidhan sabha 2019 majority of candidates are Illiterate