Mumbai Local मध्ये पुन्हा भोजपुरी गाण्यावर अश्लील नृत्य; Marathi Reels Star आक्रमक, तरुणींवर कारवाईची मागणी

सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना बघितले.
Bhojpuri Music in Mumbai local Train
Bhojpuri Music in Mumbai local Train esakal
Summary

मुंबईसह उपनगरात सामाजिक जाणीव ठेवून अनेक महत्त्वाचा विषयांवर रिल्स तयार करून मराठी रिल्स स्टार (Marathi Reels Star) लोकांमध्ये जनजागृती करत आहे.

मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये (Local Train) पुन्हा भोजपुरी संगीतावर (Bhojpuri Music) एका तरुणीचे अश्लील स्वरूपाचे नृत्य करत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर पुन्हा व्हायरल झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रवासी वर्गाकडून प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यात येत आहे.

रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नृत्यांचे व्हिडिओ बनविणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने रेल्वेने तात्काळ अशा रिल स्टारवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गासह मराठी रिल्स स्टारवर्गाकडून (Marathi Reels Star) करण्यात येत आहे.

Bhojpuri Music in Mumbai local Train
'मनुस्मृती'बाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय; म्हणाले, 'महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीची होळी करणार..'

सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना बघितले. अनेक कलाकार सुद्धा लोकलचा गर्दीचा फायदा उचलून धावत लोकलमध्ये डान्स करण्याचे प्रकार मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) घडत आहे. काही महिन्यापूर्वी धावत्या लोकलमध्ये दोन तरुणी भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभाव करीत डान्स करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्या तरुणीचा व्हिडिओ पाहून अनेकांनी समजामध्यमांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

त्याशिवाय तिच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वे पोलिसांनी ह्या व्हायरल व्हिडिओची दखल घेतल चौकशी केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा भोजपुरी संगीतावर एका तरुणीचे अश्लील स्वरूपाचे नृत्य करत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर पुन्हा व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व व्हिडिओ पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये घडत असल्याने पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) कारभावर रेल्वे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Bhojpuri Music in Mumbai local Train
Dombivli Crime : भररस्त्यात BMW Car च्या बोनेटवर बसून स्टंटबाजी; अल्पवयीन तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मराठी रिल्स स्टार आक्रमक

मुंबईसह उपनगरात सामाजिक जाणीव ठेवून अनेक महत्त्वाचा विषयांवर रिल्स तयार करून मराठी रिल्स स्टार (Marathi Reels Star) लोकांमध्ये जनजागृती करत आहे. परंतु, महामुंबईत असे अनेक परप्रांतिया रिल्स स्टार आहेत. जे झटपट प्रसिद्धी मिळविण्यासाठी अश्लील स्वरूपाचे धावत्या लोकलमध्ये रिल्स तयार करत आहे. या रिल्स स्टारला आळा घालण्यासाठी रेल्वेने उपाययोजना करावी, अन्यथा आम्ही मराठी रिल्स स्टार त्याना धडा शिकवू अशी प्रतिक्रिया पोस्टर बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिल्स स्टार चेतन गणपत कोकगे यांनी सकाळाकडे दिली आहे.

रेल्वे प्रवासात काय चाललंय? अगोदर चौपाटीवर नृत्य करत होती. आता थेट रेल्वेतही नृत्य करू लागली आहे. अशा रिल्स स्टारवर तात्काळ कारवाई करावीत. महाराष्ट्रात असले प्रकार थांबायला पाहिजे.

-शीतल कद्रेकर, प्रवासी

Bhojpuri Music in Mumbai local Train
भूमीपुत्रांच्या 'इतक्या' एकर जागेवर बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण; आक्रमक शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

धावत्या लोकलमध्ये नृत्य करणाऱ्यांवर रेल्वेचा वचक राहिलेला नाहीत. विशेष म्हणजे, यांसंदर्भात रेल्वेकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे प्रकार असे घडत आहे. रेल्वेने याकडे गंभीर पद्धतीने बघायला हवेत.

-लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय प्रवासी महासंघ

रेल्वे गाड्यात असे कृत्य करणाऱ्या समज देऊन रेल्वेकडून सोडून दिले आहे. त्यामुळे आता या 'रिल्सस्टार'वर रेल्वेकडून कठोर शिक्षा करून कारागृहात पाठविले पाहिजे. त्यानंतरच असे प्रकार थांबेल.

-नंदनकुमार देशमुख, अध्यक्ष उपनगरीय प्रवासी महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com