डोंबिवली - मराठी भाषेतून संवाद साधण्यास गेल्यास, हिंदीतून बोलण्याचा आग्रह डोंबिवली मधील ज्येष्ठ नागरिक रमेश पारखे यांना मुंबईत केला गेला. त्यांनी मराठी मधून बोलेल असे सांगताच त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी कुठेही तक्रार करा आमचं कोणीही वाकडं करू शकणार नाही असे सांगत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे पारखे यांनी सांगितले आहे.