वसई-विरारमध्ये मराठीची गळचेपी; मराठी फलक नसणाऱ्या 200 दुकानदारांना नोटीसा

वसई-विरारमध्ये मराठीची गळचेपी; मराठी फलक नसणाऱ्या 200 दुकानदारांना नोटीसा

वसई ः वसई विरार शहर महापालिकेच्या अंतर्गत हजारोच्या संख्येने खाद्यगृह , कपडे , भांडी , दूध व अन्य व्यावसायिकांची दुकाने आहेत. प्रवेशाच्या ठिकाणी दुकानाची नावे लावण्यात येतात. परंतु इंग्रजी भाषेचा अधिक वापर केला जातो आणि मराठीला बगल दिली जाते. त्यामुळे मराठी प्रेमींमधून अनेकदा नाराजगी व्यक्त केली जाते. मराठीतून दुकानाचे फलक नसणाऱ्या आचोळे प्रभागात 200 जणांना पालिकेने नोटिसा बजाविल्या आहेत.

वसईच्या महामार्गावर काही वर्षांपूर्वी धाबे व अन्य दुकानावर असणाऱ्या अन्य भाषेतील फलकाचा मनसेकडून निषेध देखील करण्यात आला होता. महाराष्ट्रात दुकाने व आस्थापने अधिनियम व महाराष्ट्र राजभाषा कायद्याप्रमाणे फलक मराठीत असावे असे असताना मात्र याची अमंलबजावणी करण्यात येत नाही. 
दुकानांचे फलक मराठीत असावेत, यासाठी मराठी एकीकरण समितीचे प्रसन्न जंगम, विक्रम डांगे, सारंग जाधव, सागर पाटील, प्रतिष शिर्के, हेमंत गुरव, पराग भोसले, सागर धोपट, जॉय जोसेफ फरगोस, प्रतीक कातकर यांनी महापालिकेकडे मराठी फलक असावेत अशी मागणी केली होती. याबाबत आता महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून , आचोळे प्रभागात 200 जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. असून वसईच्या नवघर माणिकपूर प्रभाग कार्यलयाने पथक तयार करून नोटीस देण्याचे काम सुरु केले आहे .तुमच्या दुकानावर मराठीत फलक लावावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा दुकानदारांना दिला आहे. दुकानाच्या बाहेर आता मराठीतच फलक दिसणार असल्याने मराठी प्रेमींतून आनंद व्यक्त केला जात आहे. 

महाराष्ट्र राजभाषा कायद्याप्रमाणे दुकान आस्थापनेवर असणारे फलक मराठीत असावेत या अधिनियमाप्रमाणे नवघर माणिकपूर प्रभागात ज्याठिकाणी अन्य भाषेत फलक आहेत त्यांना नोटिसा दिल्या आहेत. लवकरच प्रभाग समितीत कार्यवाही केली जाईल. 
मनाली शिंदे, सहाय्यक आयुक्त, नवघर माणिकपूर प्रभाग समिती 

वसई विरार शहरात मराठी फलक लावावेत म्हणून सुरु असलेले पालिकेचे प्रयत्न मराठीसाठी अभिमानाची बाब आहे. राज्याची राजभाषा असताना देखील अनेक ठिकाणी अन्य भाषेत फलक लावले जातात. महामार्गावर देखील गुजराती आणि अन्य भाषेत फलक लावले आहे. लवकरच आयुक्तांना भेटून अन्य भाषेतील फलक हटविण्याची मागणी करणार आहोत. 
गोवर्धन देशमुख
- अध्यक्ष , मराठी एकीकरण समिती 

 Marathi strangulation in Vasai Virar Notice to 200 shopkeepers who do not have Marathi signs

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com