मुंबई व्हेंटिलेटरवर, 'हे' आहे कारण..  

मुंबई व्हेंटिलेटरवर, 'हे' आहे कारण..  

मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. एक असं शहर जे कधीच झोपत नाही असं म्हणतात. या शहरात अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकं इथं येत असतात. अशातच आता मुंबईकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर येतेय. 

मुंबईत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी SBTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने आता रक्तदान शिबिरं घेण्याचं आवाहन केलंय. कारण मुंबईत फक्त चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई आता व्हेंटिलेटरवर आहे. 

दिवाळीमध्ये लागून आलेल्या सुट्ट्या, याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम रक्त संचलनावर  होतो. "दिवाळीनंतर सुरू होणारी आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत राहणारी रक्त युनिटची कमतरता दर वर्षी होते", असं थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले.  मुंबईत दररोज साधारण 800 ते 900 रक्ताच्या युनिट्सची गरज भासते. यापैकी 10 टक्के देखील रक्ताचा पुरवठा रक्तदान करणाऱ्यांकडून पूर्ण होत नाहीये. अशात मुंबईतील सर्व रक्तपेढ्यामिळून 4500 युनिट इतकाच रक्तासाठा आहे. इतर महिन्यांमध्ये हाच  रक्तासाठा 10,000 उपलब्ध असतो.   

त्यामुळे आता मुंबईत फक्त रक्ताचा तीव्र तुटवटा भासतोय. शहरात सध्या ४ ते ५  दिवसात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं घेतली गेली नाहीत तर याचा परिणाम थेट रूग्णांवर होणार आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने  (SBTC) मार्फत आता विविध सामाजिक संस्था त्याचसोबत कॉर्पोरेट कंपन्यांना रक्तदान शिबिरं घेण्याचे आवाहन  करण्यात येतंय.  

Webtitle : massive blood shortage in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com