
कैलास म्हामले
कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शहरातील टेकडीवर पडक्या वास्तूत सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात आज (6 मार्च) सायंकाळी भीषण आग लागून एकच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. टेकडीवरील या परिसरात जंगल भाग असल्याने आग आटोक्यात येण्यास खुप कष्ट घ्यावे लागले.कर्जत नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी वेळेत पोहचल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरीही प्रशासनाने याप्रकरणी तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.