

पाली : येथील सरसगड किल्ल्यावर शनिवारी (ता. 8) मोठा वणवा लागला होता. हा वणवा रात्री उशिरापर्यंत धुमसत होता. येथील वृक्षराजी, वनसंपदा आणि पशू-पक्षांचे अधिवास आणि अन्न जळून खाक झाले आहे. वनविभाग व स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.