
पुणे : खोपोली ते लोणावळ्या दरम्यानच्या घाटामध्ये शनिवार सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. घाटमाथ्यावर वाहतूक कोंडी झाल्याने कार, ट्रक व बससह अनेक वाहने बंद पडल्याने वृद्ध, महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.