Matheran Mini Train : माथेरानची 'राणी' हायड्रोजन इंजिनवर धावणार!

देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेननंतर हेरिटेज रेल्वेमार्गांसाठी रेल्वेचे मोठे पाऊल.
matheran chi rani

matheran chi rani

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - नेरळच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कुशीत वळणावळणाने धावणारी आणि शतकाहून अधिक काळ पर्यटकांच्या आठवणी जपणारी 'माथेरानची राणी' आता नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हरियाणातील जींद-सोनीपत मार्गावर देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा मिळाल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील या ऐतिहासिक हिल रेल्वेलाही भविष्यात हायड्रोजन इंजिनाची ताकद मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 'हायड्रोजन फॉर हेरिटेज' उपक्रमात माथेरानचा समावेश करण्यात आला असून, या ऐतिहासिक मिनी ट्रेनला पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची जोड देण्याची तयारी सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com