मुंबईकरांसाठी खुशखबर! माटुंगा-मुलुंड मेगाब्लॉक रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांसाठी खुशखबर! माटुंगा-मुलुंड मेगाब्लॉक रद्द

मध्य रेल्वेवरील माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. खंडाळा घाटात मंकी हिलजवळ काम कारण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील ब्लॉक रद्द केला आहे. 

मुंबईकरांसाठी खुशखबर! माटुंगा-मुलुंड मेगाब्लॉक रद्द

मुंबई : मध्य रेल्वेवरील माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. खंडाळा घाटात मंकी हिलजवळ काम कारण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील ब्लॉक रद्द केला आहे. 

हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्दस्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत नियमित ब्लॉक घेण्यात येणार आहे.  परिणामी वाशी, बेलापूर, पनवेल या अप-डाऊन लोकल  सकाळी 10.21 ते दुपारी 3.44 वाहतुक पूर्णपणे बंद असणार आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते मानखुर्द दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे.