Narendra Modi : 15 मेला PM मोदींची कल्याण पश्चिमेत जाहीर सभा, या होणार भागांमध्ये वाहतूकीत बदल

कल्याण पश्चिमेच्या या भागांमध्ये वाहतूकीत बदल
narendra modi
narendra modiesakal

डोंबिवली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या 15 मे रोजी कल्याण पश्चिमेत जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभा होणाऱ्या ठिकाणाच्या परिसरामध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर पोलीस उप आयुक्तांकडून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

narendra modi
Nagpur News : साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव कारने घरासमोर चिरडले; संत्रा मार्केटजवळील घटना; आरोपी चालक फरार

ठाणे, भिवंडी , कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कल्याणात येत आहेत. कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर ही जाहीर सभा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी आधारवाडी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

narendra modi
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

या जाहीर सभेसाठी सुमारे 1 लाखांच्या आसपास नागरिक येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभास्थळाच्या आसपासच्या परिसरातील वाहतुकीत वाहतूक पोलिसांकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. आज म्हणजेच मंगळवार रात्री 12 वाजल्यापासून उद्यापर्यंत हे बदल लागू असणार आहेत.

narendra modi
Sangli News : अधिकाऱ्यांच्या पाटीवर झळकले आईचे नाव

असे आहेत हे बदल...

१) आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी ब्रिज पावेतो बापगाव संपूर्ण रोड व सदर रोडला मिळणारा आतील रोड (कट) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने वाडेघर सर्कल वाडेघर गाव, काशी दर्शन बिल्डींग कडून (साईकृपा अॅटो गॅरेज) उजवे बाजूस वळण घेवून निलकंठ सृष्टी सोसायटीच्या डाव्या बाजूने मार्गस्थ होवून रोनक सिटी मार्गे साई सत्यम बिल्डींग, मुथा कॉलेज वेदांत हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जातील.

narendra modi
Nagpur Crime News : ‘पतीला पोलिस ठाण्यातून सोडविण्यासाठी १ लाख दे’

प्रवेश बंद -

२) गांधारी चौक ते भट्टी चाय (सनसेट) संपूर्ण रस्ता 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने भट्टी चाय (सनसेट) थारवानी बिल्डींगकडून उजवे बाजूने झुलेलाल चौक येथून डावे वळण घेवून गोदरेज हिल बारावे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद -

३) रूतू बिल्डींगकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने रूतू बिल्डींगकडून वेदांत हॉस्पिटल मुथा कॉलेज पाण्याच्या टाकी जवळून पुढे इच्छित स्थळी जातील.

narendra modi
Mumbai News : मुंबईवर वादळी संकट; होर्डिंग कोसळून ८ जणांचा मृत्यू,५५ जखमी

प्रवेश बंद..

४) डी मार्टकडून अग्रवाल कॉलेज मातोश्री हॉस्पिटल कडे येणाऱ्या वाहनांना 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग..

ही वाहने डी मार्ट ते वसंत व्हॅली वायलेनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद -

५) महाराजा अग्रसेन चौक कडून हिना गार्डन, तुलसीपुजा चौक, कस्तुरी पार्क, गणपती चौक कडे जाणाऱ्या वाहनांना 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

ही वाहने महाराजा अग्रसेन चौककडून डावीकडे वळून वायलेनगर येथून खडकपाडा ते दुर्गाडी अशा मुख्य वाहिनीस मिळून इच्छित स्थळी जातील.

narendra modi
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

प्रवेश बंद

६) डी बी चौक ते गणपती चौक, निक्कीनगर मार्ग 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग...

ही वाहने डी बी चौक ते ओम रेसीडन्सी समोरून डावे बाजूस वळून निलकंठ सृष्टी सोसायटीच्या उजवे बाजूने काशी दर्शन बिल्डींग समोरून डावे बाजूकडे वाडेघर गाव वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद

७) आधारवाडी सिग्नल चौक ते आधारवाडी जेल, डी बी चौक रस्ता वाहनांस 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग..

ही वाहने वाडेघर सर्कल हनुमान मंदीर, वाडेघर, काशी दर्शन बिल्डींग, समर्थ कृपा अॅटो गॅरेज कडून उजवे बाजूस निलकंठ सृष्टीच्या डावे बाजूने वळण घेवून ओम रेसीडन्सी समोरून पुढे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद -

८) वायलेनगर पोलीस चौकीकडून आधारवाडी जेल रोड कडे जाणाऱ्या वाहनांना 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग...

ही वाहने वायलेनगर पोलीस चौकी ते वायलेनगर चौक येथून मेन दुर्गाडी ते खडकपाडा मुख्य वाहिनी मार्गे इच्छित स्थळी जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com