24 हजार BEST कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात? कंत्राटदारीमुळे परिणाम होण्याची शक्यता

24 हजार BEST कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात? कंत्राटदारीमुळे परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : बेस्ट प्रशासन येत्या काळात 3 हजार भाड्याच्या बसेस घेेणार आहे. त्यामुळे परिवहन विभागाशी संबंधीत किमान 24 हजार नोकऱ्या कमी होऊ शकतील.गेल्या तीन वर्षात 4हजार 500 कर्मचारी निवृत्त झाले असून त्या जागी नवी भरती झालेली नाही. भविष्यात मुंबईच्या नकाशावरुन बेस्टचे नावच पुसले जाईल अशी भीती आज भाजपने व्यक्त केली.

बेस्ट समितीच्या बैठकीत 400 बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय झालेला आहे. यात पहिल्यांदाच बस चालका बरोबरच वाहक(कंडक्टर)कंत्राटदारामार्फत पुरवला जाणार आहे. या निर्णयाला भाजपने विरोध केला.‘बेस्टच्या खासगी करणाचे वर्तुळ पुर्ण झाले आहे’.असे आरोप बेस्टचे महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. शिवसेनेने कॉंग्रेसच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर केला असून त्यामुळे फक्त प्रवाशांचेच नाही तर भविष्यातील बेस्ट उपक्रमातील नोकऱ्यांवरही परिणाम होणार आहे. असा आरोप करत येत्या काळात बेस्ट 3 हजार बसेस भाड्याने घेणार आहे.त्याचा परिणाम थेट नोकऱ्यांवर होईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक बस मागे किमान आठ कर्मचारी असतात. मात्र, तीन हजार बसेस भाड्याच्या असल्यास थेट 24 हजार कायमस्वरुपी नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.अशी भीती बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनिल गणाचार्य यांनी व्यक्ती केली.

खासगी बसेस भाड्याने घेताना कामगार बरोबर करार करण्यात आला होता.त्यानुसार 3336 बसेसचा बेस्टचा ताफा कायमस्वरुपी राहील.मात्र,आता या ठरलेल्या करारा पेक्षा किमान 1 बसेस कमी आहेत.या नव्या बसेस खरेदी केल्या जात नाही.असा आरोप भाजपचे बेस्ट समिती सदस्य अरविंद कागीनकर यांनी केला.2017 पासून बेस्टचे 4500 कर्मचारी निवृत्त झाले आहे.त्यांच्या जागी नव्या कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही.असा आरोपही त्यांनी केला.

मंत्रालयावर मोर्चा
बेस्टच्या खासगी करणा विरोधात 17 फे्ब्रुवारी रोजी विविध संघटना मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे.या मोर्चात भाजप पुर्ण ताकदिने उतरणार आहे.या मोर्चात सहभागी होणारा भाजप हा 1कमेव राजकीय पक्ष आहे.असे भाजपचे प्रवक्ते,नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.
may Jobs loss of 24 thousand BEST employees? Likely to be affected by contracting culture in mumbai marathi news

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com