Medhe Wadghar Bridge Collapse : मेढे–वडघर पुलाखालच्या ओहळातून जीव धोक्यात घालून प्रवास; विद्यार्थी, महिला व रुग्णांची फरफट कायम

वसई पूर्वेतील मेढे–वडघर जोडणारा पूल कोसळून आठवडाभर उलटला तरी वाहतूक सुरळीत झालेली नाही. पुलाखालच्या ओहळातून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली असून सुरक्षित पर्यायी मार्गाची मागणी जोर धरत आहे.
Medhe Wadghar bridge collapse forces villagers to cross stream risking lives in Vasai East

Medhe Wadghar bridge collapse forces villagers to cross stream risking lives in Vasai East

Sakal

Updated on

विरार : वसई पूर्वेतील दुर्गम मेढे–वडघर गावांना जोडणारा जीर्ण पूल १८ जुलै रोजी अवजड ट्रकच्या भारामुळे कारसह कोसळल्यानंतर हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने पुलाच्या दुरुस्तीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्ष पूल वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, नोकरदार आणि रुग्णांची मोठी फरफट सुरूच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com