मुंबई - ग्रामीण आरोग्यसेवेतील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ (एमएमसी) लवकरच एक प्रणाली सुरू करणार आहे. त्याअंतर्गत डॉक्टरांना खेड्यापाड्यांतील वैद्यकीय शिबिरांमध्ये सहभागी होऊन ‘क्रेडिट पॉइंट’ मिळविता येतील. साधारणपणे आठवडाभरात याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
याअंतर्गत सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना त्यांच्या ‘एमएमसी’ नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी दर पाच वर्षांनी किमान ३० क्रेडिट पॉइंट मिळविणे बंधनकारक आहे. ‘एमएमसी’चे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी म्हणाले की डॉक्टरांना खेड्यांत काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे क्रेडिट पॉइंट्स देणे हा होय.
या उपक्रमामुळे केवळ ग्रामीण रुग्णांनाच फायदा होणार नाही तर डॉक्टरांनाही त्याचा लाभ होईल. या नवीन प्रणालीअंतर्गत वैद्यकीय शिबिरे आयोजित करणारी रुग्णालये किंवा धर्मादाय संस्था ‘एमएमसी’ला किमान तीन तास मोफत सेवा देणाऱ्या डॉक्टरांची माहिती देतील. यामुळे त्यांना क्रेडिट पॉइंट मिळण्यास मदत होईल.
‘एमएमसी’मध्ये नोंदणीकृत डॉक्टरांना त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी दर पाच वर्षांनी ३० क्रेडिट पॉइंट मिळवावे लागतील, ज्यासाठी दरवर्षी किमान सहा क्रेडिट पॉइंट आवश्यक असतील. यापैकी किमान ५० टक्के गुण डॉक्टरांच्या क्षेत्रातील तज्ञांचे असावेत, अशी अट आहे.
क्यूआर कोडमधून ओळख पटणार
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल दोन आठवड्यांत नोंदणीकृत डॉक्टरांसाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू करणार आहे. या क्यूआर कोडच्या मदतीने रुग्ण हे डॉक्टरांची पात्रता आणि एमएमसी नोंदणी क्रमांकासह त्यांची ओळख पटवू शकतील. त्यामुळे राज्यातील बोगस डॉक्टरांना आळा बसेल व रुग्णांची फसवणूक टाळता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.