मीनाक्षी थापा हत्या प्रकरण : दोघांना जन्मठेप 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - नेपाळी अभिनेत्री मीनाक्षी थापा हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हत्या, अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यात अमितकुमार जयस्वाल आणि त्याची प्रेयसी प्रीती सुरीन या दोघांना सत्र न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी दोषी ठरविले होते. या शिक्षेवरील निकाल देताना दोघांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. 

बॉलीवूडमध्ये करिअर करण्याच्या हेतूने मुंबईत आलेल्या मीनाक्षीची 2012 साली हत्या झाली होती. अमितकुमार आणि प्रीती यांनी मैत्रीचे नाटक करून अत्यंत शांत डोक्‍याने खुनाचा कट रचला होता. मीनाक्षीचे मुंबईतून अपहरण करून तिला उत्तर प्रदेशात नेण्यात आले आणि खंडणीसाठी आई-वडिलांना धमकावून 12 मार्च 2012 रोजी तिची हत्या करण्यात आली होती. अमित कुमार आणि प्रीती या दोघांना 9 मे 2012 रोजी वांद्रे येथून एटीएममधून पैसे काढताना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि खटल्यातील 35 साक्षीदारांच्या नोंदवलेल्या साक्षी या आधारे दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. 

Web Title: Meenakshi Thapa murder case