Meera Road Crime : ती 22 अन् आरोपी 46 वर्षांचा! रेशन दुकानातून खुललं प्रेम, पण शेवट...

Meera Road Crime
Meera Road Crime

मुंबईतील मिरा रोडी येथे एका महिलेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मृतदेहाचे आरोपीने अनेक तुकडे केल्याचं समोर आलं. दोघांचं प्रेम दहा वर्षांपूर्वी एका रेशन दुकानात खुललं. मात्र त्याचा शेवट अत्यंत क्रुरपद्धतीने झाला आहे.

Meera Road Crime
Mumbai News : मुंबईकरांना दिलासा! एसी लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती; कारण...

मिरा रोड येथे महिलेची हत्या करुन तिचे तुकडे करण्यात आल्याच्या घटनेत पोलीस तपासात खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर महिलेच्या शरीराचे इलेक्ट्रीक करवतीने तुकडे करुन ते कुकरमध्ये शिजवले व नंतर त्यातील काही तुकडे फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मृत महिला आणि आरोपी हे दोघे लिव्ह इनमध्ये राहात होते. महिलेचं वय ३२ तर आरोपी ५६ वर्षांचा आहे.

सरस्वती वैद्य (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव मनोज साने (वय ५६) आहे. दोघे मिरा रोडच्या नयानगर परिसरातील गीता नगर भागातील आकाश दीप इमारती राहात होते.

Meera Road Crime
Shiv Sena - BJP : शिवसेनेच्या वर्चस्वामुळे भाजप मध्ये 'असहकार्या' चे सूर

मिळालेल्या माहितीनुसार मनोज साने हा बोरिवली येथील शिधावाटप दुकानात काम करत होता. त्याची दहा वर्षांपूर्वी सरस्वतीसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहु लागले. तेव्हा सरस्वतीचे वय २२ तर मनोज साने वय दुप्पटीहून अधिक अर्थात ४६ वर्षे वय होते. पाचच वर्षांपूर्वी ते मिरा रोडला भाड्याच्या घरात रहायला आले होते.

दरम्यान मनोज नेहमी घरी उशिरा येत असे. त्यामुळे दोघांच्या प्रेमात वितुष्ट निर्माण झाले. मनोजचे अन्यत्र अनैतिक संबंध असल्याचा सरस्वतीला संशय होता. यातून दोघांचे सातत्याने भांडण होऊ लागले. याच भांडणातून सरस्वतीला जीव गमवावा लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एकंदरीतच राशन दुकानातून खुललेल्या प्रेमाचा शेवट अत्यंत धक्कादायक झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com