esakal | रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आणि विशेष ट्रॅफिक ब्लॉक...
sakal

बोलून बातमी शोधा

railway megabloack

दिवा आणि कल्याण यांच्या दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक कोपर ते डोंबिवली स्थानकांदरम्यान कल्याण डोंबिवली महानगर पालीकेचा जुना वापरात नसलेला पाईपलाईन पूल पाडण्यात येणार आहे. यादरम्यान अप जलद पाचवी आणि सहावी लाइन दुपारी 1.20 ते सायं. 6.50 पर्यंत आणि दुपारी 3.20 ते दुपारी 4.50 पर्यंत डाउन जलद मार्ग, अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आणि विशेष ट्रॅफिक ब्लॉक...

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मार्गावर रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक व उपनगरी भागातील जुना वापरात नसलेला पाइपलाइन पूल तोडण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक कार्यान्वित करण्यात आले आहे.

दिवा आणि कल्याण यांच्या दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक कोपर ते डोंबिवली स्थानकांदरम्यान कल्याण डोंबिवली महानगर पालीकेचा जुना वापरात नसलेला पाईपलाईन पूल पाडण्यात येणार आहे. यादरम्यान अप जलद पाचवी आणि सहावी लाइन दुपारी 1.20 ते सायं. 6.50 पर्यंत आणि दुपारी 3.20 ते दुपारी 4.50 पर्यंत डाउन जलद मार्ग, अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
  
मुख्य लाइन... 

ठाणे - कल्याण अप व डाउन जलद मार्ग दुपारी 12.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत तर सकाळी 11.5 ते दुपारी 2.17 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या डाउन जलद विशेष सेवा ठाणे ते कल्याण दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर, सकाळी 11.47 ते सायंकाळी 6.39 दरम्यान कल्याण येथून सुटणा-या अप जलद विशेष सेवा कल्याण व ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येऊन निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील. त्यासह दिवा आणि कल्याण दरम्यान दुपारी 3.20 ते दुपारी 4.50 दरम्यान सर्व उपनगरी विशेष सेवा बंद राहतील.

मेल / एक्स्प्रेस गाड्यांचे पुनःनिर्धारण... 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.5 वाजता सुटणारी ट्रेन क्रमांक 01019 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - भुवनेश्वर हि विशेष गाडी 2 ऑगष्ट रोजी पुनःनिर्धारित वेळेनुसार दुपारी 4 वाजता सुटेल.

हार्बर लाइन... 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.25 ते संध्याकाळी 4.25 पर्यंत
चुनाभट्टी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4 पर्यंत पनवेलला जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील.
सकाळी 9.45 ते दुपारी 2.41 या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील विशेष सेवा बंद राहतील.
त्यामुळे, ब्लॉक कालावधीत विशेष लोकल गाड्या पनवेल - कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेलसाठी गाड्या चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले