मुंबईत येत्या रविवारी रेल्वेने प्रवास‌ करणार‌ असाल, तर...

मुंबईत येत्या रविवारी रेल्वेने प्रवास‌ करणार‌ असाल, तर...

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर,सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या -देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (ता.23) मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मांटुगा ते मुंलुड डाऊन जलद, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप- डाऊन तर बोरीवली ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे :

कुठे : मांटुगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर
कधी :  स. 10.30 ते दु. 3.00 वाजेपर्यंत
परिणामी : माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन जलद मार्गावरील वाहतूक डाउन धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे :

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर
कधी : स. 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
परिणाम : स. 9.56 तेदु. 4.23 वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरगाव दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.  तर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी स. 9.53 तेदु. 2.44 अप- डाऊन वाहतूक बंद राहणार आहे . या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे :

कुठे : बोरीवली ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत
परिणाम : अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल अप-डाऊन धीम्या मार्गावर,  दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com