रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; मुख्य आणि पश्चिम मार्गावर प्रवासास परवानगी

प्रशांत कांबळे
Saturday, 21 November 2020

मध्य रेल्वेतर्फे देखभाल व दुरुस्तीसाठी रविवारी (ता. 22) हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर कल्याण येथील पत्री पुलावर गर्डरच्या कामासाठी ब्लॉक आधीच जाहीर केला आहे. 

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे देखभाल व दुरुस्तीसाठी रविवारी (ता. 22) हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर कल्याण येथील पत्री पुलावर गर्डरच्या कामासाठी ब्लॉक आधीच जाहीर केला आहे. 

हेही वाचा - लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून शिवसेना कोंडीत? महाविकास आघाडीवर भाजपची टीका

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला फलाट क्रमांक आठदरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मेन लाईन व पश्‍चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील. 

कुठे- सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर आणि चुनाभट्टी, वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर 

कधी- सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत 

परिणाम- सीएसएमटी, वडाळा रोड येथून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 या वेळेत जाणाऱ्या आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 दरम्यान वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन सेवा रद्द राहतील. त्यासोबतच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत सुटणाऱ्या आणि गोरगाव, वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते दुपारी 4.58 दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा रद्द राहतील.

Megablock on Harbor Road on Sunday Permission to travel on main and western routes

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megablock on Harbor Road on Sunday Permission to travel on main and western routes