esakal | रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक
sakal

बोलून बातमी शोधा

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते मुंबई सेंट्रल दरम्यान 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री रात्रकालीन पाच तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरी भागात रविवारी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे राबविण्यासाठी मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे.

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते मुंबई सेंट्रल दरम्यान 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री रात्रकालीन पाच तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
यादरम्यान रेल्वे रूळ, सिंग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यासह विविध देखभाल दुरुस्तीची काम केली जाणार आहे. त्यासाठी माहीम आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप जलद मार्ग आणि पाचव्या रेल्वे मार्गावर शनिवारी ते रविवारी रात्री 11 ते पहाटे 4 वाजता पर्यंत हा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. जम्बोब्लॉक दरम्यान सांताक्रूज आणि मुंबई सेंट्रल,चर्चगेट दरम्यान अप मार्गावरील सर्व जलद ट्रेन धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. 

रविवारी मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरी भागात रविवारी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे राबविण्यासाठी मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी विभागात विशेष गाड्या धावतील. तर ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

कुठे

ठाणे-कल्याण अप आणि डाउन  जलद मार्गावर 

कधी

सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान

परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.33 ते दुपारी 2.48 दरम्यान सुटणा-या जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या  मार्गावर वळविण्यात येणार आहेत आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर
सकाळी 10.26 ते दुपारी 3.19 दरम्यान कल्याण येथून सुटणा-या जलद मार्गावरील सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील.  

कुठे

पनवेल - वाशी अप आणि डाउन  हार्बर मार्गावर
 
कधी

सकाळी 11.5 ते दुपारी 4.5 दरम्यान 

परिणाम

पनवेल, बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 4.1 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणा-या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.44 ते दुपारी 3.16 दरम्यान बेलापूर, पनवेलला सुटणा-या  डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.  तर पनवेलहून दुपारी 2.24  वाजता ठाण्याकडे जाणारी ट्रान्स हार्बर मार्गावरील अप सेवा आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे येथून दुपारी 1.24 वाजता पनवेलला जाणारी सेवा रद्द राहील.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Megablocks on the Central and Western Railways on Sunday

loading image