Dasara Melava 1999: सोनिया गांधींची काँग्रेस आणि सेना एकत्र आली असती तर... आठवणी बाळासाहेबांच्या; दस्तावेज 'सकाळ'चे

Balasaheb Thackeray Dasra Melava
Balasaheb Thackeray Dasra Melavasakal

श्रीकृष्ण आयोगाच्या माध्यमातून शिवसेनेवर किंवा आमच्या नेत्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सहन करणार नाही आणि माझे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असे बाळासाहेब ठाकरे १९९९च्या दसऱ्या मेळाव्यात म्हणाले होते

"शिवसेनेने सत्तेसाठी कोणतीही तडजोड केली नाही, सोनिया गांधींची काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली असती तर सहज सत्ता मिळाली असती; परंतु आम्ही सत्तेसाठी कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करू शकत नाही, म्हणून सत्तेबाहेर राहून पाठिंबा देण्यासारखा त्याग केवळ पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ नयेत म्हणूनच करण्याची तयारी दाखविलो होते

शिवसेनेला कोकणी माणसाने पुन्हा एकदा साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून शिवसेनाप्रमुख म्हणाले, की कोकणाने नया आदर्श घालून दिला असताना मुंबईत काही ठिकाणी गद्दारी झाली. ज्यांना खासदार केले त्या मुकेश पटेल यांनी युती सरकारविरोधी कारवाया केल्या.मुकेश पटेल यांना या क्षणी मी शिवसेनेतून काढून टाकतो तसेच वांद्रे व अंधेरी परिसरात शिवसेनेविरुद्ध काम करणाऱ्यांनाही मी दोन दिवसांत शिवसेनेतून हाकलून देणार आहे. यापुढे शिवसेनेत गदारी खपवून घेतली जाणार नाही.

शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख आज काही तरी सनसनाटी गर्जना करतील, अशी सर्वांचीच खात्री होती भाजप नेतृत्वच कारणीभूत आहे. विशेषतः गोपीनाथ मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदापायी सत्ता चालविली. अशी शिवसेना कार्यकर्त्यांची धारणा झाली होती. याच अनुषंगाने मुंडेंवर शिवसेनाप्रमुख जोरदार प्रहार करतील का, अशी सभेपूर्वी सर्वच शिवसेना कार्यकत्पति कुजबुज होती.

Balasaheb Thackeray Dasra Melava
Mahrashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा उद्या फैसला; झिरवाळ म्हणतात, सरकार स्थिर व्हायला पाहिजे!

परंतु शिवसेनाप्रमुखांचे ७ वाजून १५ मिनिटांनी व्यासपीठावर मुंडेंचे आगमन झाले. तेव्हा सर्वच अवाक झाले मात्र, याचा राग शिवसेना कार्यकत्यांनी व्यक्त केला तो मुंडेच्या सत्काराच्या वेळी एकही टाळी न वाजवता

सतत पक्षांतर करणाऱ्यांवर टीका करताना श्री. ठाकरे म्हणाले, पतप्रधान वाजपेयींना आपण पक्षांतरविरोधी कायदा कडक करण्यास सांगणार आहोत. एकदा निवडून आल्यावर जर कोणाला पक्ष बदलावयाचा असेल, तर त्याने जनतेचा आदेश घेतला पाहिजे. नाहीतर त्याचे पदच नव्हे, तर त्याला त्यानंतर उमेदवार म्हणून उभे राहण्याची परवानगी देऊ नये."

राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीचे सरकार आले नसले, तरी लवकरच पुन्हा मंत्रालयावर भगवा फडकविण्याची शपथ त्यांनी घेतली. ते म्हणाले, की या वेळी आमच्याही चुका झाल्या त्या आम्ही सामोपचाराने सुधारल्या. मात्र विरोधकांनी त्याचेच भांडवल करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तणाव वाढला, तरीही युती तुटणे शक्य नाही. ही युती तत्त्वावर आधारलेली आहे, सतेवर नाही. आम्ही सत्तेपेक्षा तत्वाला जास्त महत्त्व देतो, असे श्री. ठाकरे म्हणाले,

Balasaheb Thackeray Dasra Melava
Firing Maha Bodhi Vihar: गयाच्या महाबोधी विहार परिसरात गोळीबार; एका पोलिसाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com