"त्या" डॉक्टरच्या कुटुंबियांचाही मानसिक छळ! राहत्या घरातून बाहेर काढण्यासाठी दबाव...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 एप्रिल 2020

  • करोनाबाधित डॉक्टरच्या कुटुंबियांचाही मानसिक छळ
  • ठाण्यातील उच्चभ्रू संकुलातील घटना; घरातून बाहेर काढण्यासाठी दबाव

ठाणे :  ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देऊन, त्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्यासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ठाण्यातील वसंतविहार भागात कोरोनाबाधित डॉक्टर राहतात. त्यांचे ठाण्यात मोठे रूग्णालय आहे. रविवारी त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीला घरातच अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, संकुलातील रहिवाशांनी या कुटुंबियांना भाईंदरपाडा येथील अलगीकरणकक्षात ठेवण्यास दबाव आणत आक्रमक होऊ लागले. संबंधित डॉक्टरांचे या इमारतीत प्रशस्त घर आहे. त्यामुळे त्यांना गृह अलगीकरण ठेवण्यास विरोध का? असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विचारला जावू लागला आहे. 
अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mental torture of family members of a doctor who is crippled