आज दिवसभर ढगात वातावरण राहिले.काही भागात मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या २४ तासांत शहरात १३ मिमी, पूर्व उपनगरात १६ मिमी, तर पश्चिम उपनगरात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.उद्या ही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. आज दुपारी १२:०३ वाजता ४.१८ मीटर ची उंच भरती दिसली तर रात्री ११:५० वाजता ३.६० मीटर उंच भरती होती. यावेळी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. तर सायंकाळी ६:१० वाजता २.०३ मीटर खोल ओहोटी होती.