मेट्रो 3 च्या विधान भवन स्थानकाचे बांधकाम पूर्ण; 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीचे बांधकाम

तेजस वाघमारे
Wednesday, 2 September 2020

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ( एमएमआरसी ) द्वारे विधान भवन मेट्रो स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ( एमएमआरसी ) द्वारे विधान भवन मेट्रो स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे बांधकाम मेट्रो 3 च्या पॅकेज 1 अंतर्गत येते . यात तळाची स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब आणि छताची स्लॅब बांधकामाचा समावेश आहे. तसेच पॅकेज 7 अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी स्थानकाचे देखील तिन्ही स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

विधान भवन स्थानकाचे बांधकाम 'कट आणि कव्हर' या आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी सात प्रवेश-निकसद्वारांची सुविधा असेल. मुंबई मेट्रो 3 मार्गिकेवरील विधान भवन स्थानकात चाकरमान्यांची वर्दळ अधिक प्रमाणात असेल. या स्थानकाद्वारे मंत्रालय, विधान भवन, नवीन प्रशासकीय इमारत जोडले जातील, असे एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले. 

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिण्यात होणार परीक्षा

विधान भवन स्थानकाचे 75.45 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. या स्थानकावरून दररोज 75 हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करणे अपेक्षित आहे. पॅकेज 1 अंतर्गत हुतात्मा चौक, चर्चगेट आणि कफ परेड या मेट्रो स्थानकाची कामे देखील वेगात सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro 3s Vidhan Bhavan station completed; Construction of modern method of cut and cover