esakal | कुलाबा-वांद्रे-सिप्झ 'मेट्रो 3' प्रकल्पाच्या खर्चात 10 हजार 270 कोटींची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Metro

मुंबई 'मेट्रो 3' प्रकल्पाच्या खर्चात 10 हजार 270 कोटींची वाढ

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 (Metro Railway) भुयारी मार्ग प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 10 हजार 270 कोटींची वाढ झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) खर्चाचा सुधारित अहवाल तयार केला असून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे (State Government) पाठविण्यात येणार आहे. 23 हजार 136 कोटींचा हा प्रकल्प (Project) आता 33 हजार 406 कोटींवर पोहोचला आहे. बोगदे व स्टेशन, डेपो आणि रेल्वे रूळ याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रकल्प खर्चात (Project Cost) वाढ झाली आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मेट्रो 3 प्रकल्प भूमिगत असून तो 33. 5 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावरील 26 स्थानके भुयारी असून 1 जमिनीवर प्रस्तावित आहे. प्रकल्प सुरु झाला तेव्हा प्रकल्पाची किंमत 23 हजार 136 कोटी अपेक्षित होती. हा प्रकल्प 2021 मध्ये प्रवाशांच्या सेवेत (Travelers) दाखल होणार होता. परंतु आरेमध्ये (Aare ) उभारण्यात येणाऱ्या कारशेडला विरोध झाल्याने या प्रकल्पात व्यत्यय निर्माण झाला आहे. ( Metro three project cost increases MMRC Improvement report is ready)

हेही वाचा: KDMC : शासकीय जमिनी सुरक्षित राहायला हव्यात - उच्च न्यायालय

कारशेडसाठी जागेचा शोध सुरु असतानाच आता या प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 10 हजार 270 कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे. कारडेपोचा प्रश्न अनुत्तरित असतानाच प्रशासनाने डिसेंबर 2021 पासून आरे ते बीकेसी या मार्गावर मेट्रो 3 चा पहिला टप्पा सुरु करण्याची तयारी केली आहे. तर दुसरा टप्पा जून 2022 पासून बीकेसी ते कुलाबा दरम्यान सुरु करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. एमएमआरसीने खर्चाचा सुधारित प्रकल्प आराखडा तयार केला आहे. बोगदे व स्टेशन, डेपो, रेल्वे रूळ यावर यापूर्वी 10 हजार 708 कोटी रुपये खर्च होणार होता. परंतु सुधारित प्रकल्प अहवालानुसार याच कामांसाठी 18 हजार 711 हजार रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. वीज पुरवठा, रेल्वे गाड्या यासाठी यापूर्वी 3 हजार 128 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. हा खर्च 4 हजार 391 रुपये झाला आहे. तर राज्याचा 806 रुपयांचा कर वगळून कराची रक्कम आता 2 हजार 143 कोटी अंदाजे ठरविण्यात आली आहे.

त्यामुळे 31 जानेवारी 2021 पर्यंतच्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार 33 हजार 406 कोटी रुपये खर्च मेट्रो 3 साठी प्रस्तावित करण्यात आला आहे. आतापर्यंत एमएमआरसीला 17 हजार 68 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 16 हजार 770 कोटी रुपये खर्च झाला आहे. याबाबत एमएमआरसीचे व्यस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

loading image