esakal | म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच

म्हाडाच्या कोकण मंडळाने सोडतीची तयारी सुरु केली असून तब्बल 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.

म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत काढण्याचे सूतोवाच नुकतेच केले होते. त्यानुसार मंडळाने सोडतीची तयारी सुरु केली असून तब्बल 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. या सोडतीमधील घरे ठाणे, कल्याण परिसरात आहेत.

लॉकडाऊनमुळे कोकण मंडळाची सोडत लांबणीवर गेली होती. ही सोडत काढण्याची तयारी मंडळाने सुरु केली आहे. या सोडतीमध्ये  ठाण्यातील भंडारली आणि गोटेघर येथील घरांचा समावेश असणार आहे. तर कल्याणमधील शिरढोण खोणी येथील घरांचा समावेश असेल. मार्च अखेरीस मंडळाकडून सोडतीची प्रक्रिया सुरू होईल. तर मे महिन्यात सोडत काढण्यात येईल, असे कोकण मंडळातील सूत्रांनी सांगितले.  ठाणे, कल्याण परिसरातील घरे ही आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच होऊ घातलेली लॉटरी आणि त्यातील घरांचा आढावा घेतला.  म्हाडाचा ठाणे, कल्याण, नवी मुंबई भागातील सुमारे 8 हजार घरांची लॉटरी करण्याचा मानस आहे.

हेही वाचा- मुंबईत पुन्हा धमाके, यारी रोडवर स्फोटाचे आवाज ऐकून परिसरात घबराट

या बंपर लॉटरीमध्ये कुठे आणि किती घरं असतील हे खालीलप्रमाणे

ठिकाण एकूण घरं
   
ठाणे, वर्तकनगर 67
ठाणे शहर (विखुरलेली घरं) 821
घणसोली, नवी मुंबई 40
भंडार्ली, ठाणे ग्रामीण 1771
गोठेघर, ठाणे ग्रामीण 1185
खोणी- कल्याण ग्रामीण 2016
वाळीव वसई  43

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mhada draw lottery 7500 houses kokan thane new mumbai

loading image