Mhada Homes : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरे आणि भूखंडासाठी आज ठाण्यात सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६४० घरे आणि १४ भूखंडासाठी आज ठाण्यात सोडत होणार आहे. सोडतीच्या स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली.
MHADA Konkan Mandal homes draw
MHADA Konkan Mandal homes drawsakal
Summary

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६४० घरे आणि १४ भूखंडासाठी आज ठाण्यात सोडत होणार आहे. सोडतीच्या स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली.

मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६४० घरे आणि १४ भूखंडासाठी आज ठाण्यात सोडत होणार आहे. सोडतीच्या स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली. यानुसार एकूण ४९ हजार १७४ अर्ज यामध्ये पात्र ठरले आहेत. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात ही सोडत होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडणार असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ८ मार्चपासून नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली होती. स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार ४९ हजार १७४ अर्ज सोडत प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.

यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी ३५१ अर्ज, २० टक्के सर्वसमावेश योजनेसाठी ४६ हजार १६ अर्ज, म्हाडाच्या घरांसाठी २ हजार ४३८ अर्ज तर प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी ३६९ अर्ज पात्र ठरले आहेत. आता अर्जदारांची प्रतीक्षा संपली असून आज या घरांसाठी सोडत पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com