esakal | प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मिळणार पाणी; म्हाडा विजेत्यांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

pradhanmantri awas yojana

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मिळणार पाणी; म्हाडा विजेत्यांना दिलासा

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : म्हाडाच्या (mhada) कोकण मंडळामार्फत (Konkan region) ठाणे जिल्ह्यात (thane) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (pradhan mantri awas yojna) उभारण्यात आलेल्या शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर येथील घरांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा विभागाने म्हाडाच्या घरांना (Mhada Homes) उल्हास नदीतून (ulhas River) पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण मंडळाच्या 2018 च्या सोडतीमधील 3 हजार 137 विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: भविष्यात आकाशगंगेचा अभ्यास करण्यास अधिक स्पष्टता; श्रुती बडोले यांचा समावेश

पंतप्रधान आवास योजनेतून शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर येथे घरे उभारण्यात येत आहेत. कोकण मंडळाने 2018 मध्ये शिरढोण आणि खोणी येथील घरांची सोडत काढली. सोडतीमधील काही विजेत्यांनी घराचा ताबाही घेतला आहे. परंतु सध्या या विजेत्यांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हाडाच्या प्रकल्पाला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अधिकाऱ्यांकडून अनेक वर्ष पाठपुरावा सुरु होता. अखेर जलसंपदा विभागाने पंतप्रधान आवास योजनेतील घरांना पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे म्हाडा सोडतीमधील विजेत्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

कोकण मंडळामार्फत काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये शिरढोण येथील 624, खोणी 586 , सर्वे क्रमांक 162 खोणी 2016, भंडार्ली 1769, गोठेघर 1185 अशा एकूण 6 हजार 180 घरांचा समावेश करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने उल्हास नदीतून या घरांना पाणी देण्यास परवानगी दिल्याने या सोडतीमध्ये विजयी होणाऱ्या विजेत्यांनाही दिलासा मिळणार आहे.गेली अनेक वर्षे पंतप्रधान आवास योजनेतील घरांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर जलसंपदा विभागाने पाणी पुरवठ्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच जलवाहिनी टाकण्याचे कामाला सुरुवात होईल, असे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी सांगितले.

loading image
go to top