esakal | MHADA lottery 2020-2021: म्हाडाची मुंबईतील लॉटरी उद्या दुपारी
sakal

बोलून बातमी शोधा

MHADA lottery 2020-2021: म्हाडाची मुंबईतील लॉटरी उद्या दुपारी

उद्या म्हणजे गुरुवारी 10 तारखेला मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी निघणार आहे.

MHADA lottery 2020-2021: म्हाडाची मुंबईतील लॉटरी उद्या दुपारी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: उद्या म्हणजे गुरुवारी 10 तारखेला मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी निघणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी ही लॉटरी सोडत असणार आहे. दुपारी १२.३० वाजता ही लॉटरी निघेल. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बीडीडी चाळीतील पुनर्विकासाच्या पहिल्या टप्यातील घरांची लॉटरी आहे. 

विरार येथील पोलिसांच्या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. कोणी शिरढोण इथे घरांचीही लॉटरी काढणार आहोत. ज्या पोलिसांना घरं हवी आहेत त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा. पोलिस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरं उपलब्ध करून देणार, असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. 

कोळीवाड्यात SRA योजना नाही

कोळीवाडे ही गावठाणे आहेत. गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरं बांधली आहेत. जरी ही बैठी घरं असली तरी तिथे SRA योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना FSI देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न असल्यचांही त्यांनी म्हटलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

म्हाडाची ७ हजार घरांसाठी सोडत 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत काढण्याचे सूतोवाच नुकतेच केले होते. त्यानुसार मंडळाने सोडतीची तयारी सुरु केली असून तब्बल 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. या सोडतीमधील घरे ठाणे, कल्याण परिसरात आहेत.

लॉकडाऊनमुळे कोकण मंडळाची सोडत लांबणीवर गेली होती. ही सोडत काढण्याची तयारी मंडळाने सुरु केली आहे. या सोडतीमध्ये  ठाण्यातील भंडारली आणि गोटेघर येथील घरांचा समावेश असणार आहे. तर कल्याणमधील शिरढोण खोणी येथील घरांचा समावेश असेल. मार्च अखेरीस मंडळाकडून सोडतीची प्रक्रिया सुरू होईल. तर मे महिन्यात सोडत काढण्यात येईल, असे कोकण मंडळातील सूत्रांनी सांगितले.  ठाणे, कल्याण परिसरातील घरे ही आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत.

हेही वाचा- भंगार विकून मध्य रेल्वेला मिळाले तब्बल 225 कोटी रुपये

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच होऊ घातलेली लॉटरी आणि त्यातील घरांचा आढावा घेतला. म्हाडाचा ठाणे, कल्याण, नवी मुंबई भागातील सुमारे 8 हजार घरांची लॉटरी करण्याचा मानस आहे.

MHADA lottery 2020 2021 Jitendra Awhad Mumbai bdd chawl

loading image