

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे मुंबईत २०३० घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. यानंतर अनेक जणांकडून यासाठी अर्ज केले जात आहेत. दरम्यान म्हाडाच्या वेबसाईटची हुबेहुब कॉपी करत एक बनवट वेबसाईट सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Mhada.housing.gov.in ही खरी वेबसाईट असून Mhada.org ही बनावट वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्याता आहे.