म्हाडा पुण्यात उभारणार व्यापारी संकुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mhada

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ताथवडे येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने गृहप्रकल्प हाती घेतला आहे.

म्हाडा पुण्यात उभारणार व्यापारी संकुल

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ताथवडे येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) गृहप्रकल्प (Home Project) हाती घेतला आहे. या प्रकल्पात मंडळाने भव्य व्यापारी संकुल उभारण्याची योजना आखली आहे. पुणे मंडळाने दोन हजार ७०३ घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज (Online Form) मागवले असून यामध्ये ताथवडे येथील पहिल्या टप्यातील मध्यम उत्पन्न गटातील ६८० घरांचा समावेश करण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात येथे ५६४ घरे उभारण्यात येणार आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे मंडळाने दोन हजार ७०३ घरांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी इच्छुकांना ३० मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर २२ एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ताथवडे येथील मध्यम उत्पन्न गटातील ६८० घरांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील चार इमारतींचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्या चारही इमारतींचे १९ व्या मजल्यापर्यंतचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पातील दुसऱ्या टप्यात मध्यम उत्पन्न गटातील ४८०, उच्च उत्पन्न गटातील ८४ सदनिका तसेच ४५ दुकाने व १३ कार्यालये असे भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून या टप्याचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे, म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले.