Mhaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांची तयारी पूर्ण, दादरमधील हे रस्ते बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mhaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांची तयारी पूर्ण, दादरमधील हे रस्ते बंद

Mhaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांची तयारी पूर्ण, दादरमधील हे रस्ते बंद

Mumbai: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या पुण्यतिथी अर्थात महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दादरमधील वाहतूक वळवण्याबाबत आणि वाहतूक निर्बंध जारी केले आहे.दादर येथील शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवशी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनुयायांचा जनसागर लोटणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत दादर येथील चैत्यभूमीला भेट देणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादरच्या परिसरात रस्त्यांवर वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादरच्या परिसरात काही मार्ग वाहतुकसाठी वळवण्यात आले असून काही मार्ग वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी या जारी केलेल्या आदेशात जनतेला धोका गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत सुरळीत व्हावी यासाठी 5 डिसेंबर सकाळी 6.00 वाजल्यापासून खालील वाहतूक निर्बंध लागू केले जातील. 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत वाहतूक निर्बंध लागू असतील.

हेही वाचा: PM Modi : मोदींना थोरल्या भावाचा सल्ला, आता त्यांनी...; वाचा काय म्हणाले सोमभाऊ

हेही वाचा- First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

दादरमधील हे रस्ते बंद/ काही एकेरी मार्गाने

1. स्वतंत्र वीर सावरकर रस्ता सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील. तथापि, स्थानिक रहिवासी येस बँक जंक्शन येथून डावीकडे वळणे घेऊन पुढे जाऊ शकतात आणि पांडुरंग नाईक रोडने राजा बडे चौकाकडे जातील.

2. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगज चर्च जंक्शन असा एकेरी मार्ग असेल.म्हणजे बोले रोड च्या दक्षिण सीमेकडून वाहनांच्या वाहतुकीला प्रवेश नसेल.

3. रानडे रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

5. ज्ञानेश्वर मंदिर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील

6. जांभेकर महाराज रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

7. केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहील.

8. एम.बी. राऊत रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

9. एलजे रोड शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी कटारिया रोड बंद राहील.

खालील रस्त्यांवर स अवजड वाहनांना प्रवेशबंदी

-एस.व्ही. एस रोड- माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन

- एलजे. रोड- माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन

- गोखले रोड- गडकरी जंक्शन ते धनमील नाका.

- सेनापताई बापट रोड- माहीम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका

- टिळक पुलापासून ते सर्व एन.सी. केळकर रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

या ठिकाणी पार्किंग उपलब्ध-

- सेनापती बापट मार्ग, माहीम आणि दादर पश्चिम.

- कामगार स्टेडियम (सेनापती बापट मार्ग).

- इंडिया बुल्स इंटरनॅशनल सेंटर, (सेनापती बापट रोड, एल्फिन्स्टन).

- वन इंडिया बुल्स सेंटर, ज्युपिटर मिल कंपाउंड, एल्फिन्स्टन वेस्ट.

- कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कंपाउंड, दादर.

- लोढा, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल.

- पाच गार्डन्स, माटुंगा पूर्व.

- एडेनवाला रोड, माटुंगा पूर्व.

- नथाला पारेख रोड, माटुंगा पूर्व