म्हसळा रुग्णालयात अधिक सुविधा देणार

पालकमंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही
raigad
raigadsakal

माणगाव : म्हसळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि मोफत रुग्णसेवा मिळण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करून म्हसळा शहरात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे. गेल्या दोन वर्षात हे रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी अथक मेहनत घेतली. येथे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेल्या ‘बायो मेडिकल वेस्ट प्लांट’ आणि १२ ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या उद्‌घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

ज्येष्ठ नेते अलीशेठ कौचाली, समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार समीर घारे, पोलिस निरीक्षक उद्धव सुर्वे, गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे, प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे, बांधकाम अभियंता गणगणे, पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे, माजी सभापती नाजीमभाई हसवारे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, रेश्मा कणसे, शगुप्ता जहांगीर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com