
डोंबिवली : देसाई गावात एका जागेवरुन सुरु असलेल्या वादातून परप्रांतीय महिलांनी गावात शिरकाव करत शेतकरी कुटूंबांना धमकावित त्यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच भूमिपुत्रांनी याविषयी शीळ डायघर पोलिसांना याची कल्पना दिली असता पोलिसांना देखील या महिलांनी धक्काबुक्की केल्याची बाब व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. याचे व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाले असून परप्रांतीय महिलांची दहशत या भागात पहायला मिळत आहे.