हेच ठरू शकतं कारण कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या लाटेचं, धारावीतल्या 'हाय रिस्क' झोनमधले कामगारही...

हेच ठरू शकतं कारण कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या लाटेचं, धारावीतल्या 'हाय रिस्क' झोनमधले कामगारही...

मुंबई, ता.16: धारावीत राहणारे स्थलांतरीत कामगार आपल्या आपल्या राज्याची वाट धरत आहेत. यातील बहुतांश कामगार हे हाय रिस्क झोनमध्ये राहतात. त्यामुळे या कामगारांकडून संबधित कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. गुरुवारी श्रमीक स्पेशल ट्रेनमधून उत्तर प्रदेशला गेलेल्या कामगारांमध्ये 50 टक्के कामगार हे धारावीतल्या हायरिस्क झोनमधील नागरिक आहेत.

हाय रीस्क झोनमधील कामगार :

मुंबईतून मोठ्या प्रमाणावर  स्थलांतरीत कामगार  आपल्या आपल्या राज्यात निघाले आहेत. एकट्या धारावीतूनचं दिड लाख कामगारांनी प्रवासासाठी परवानगी मागितली आहे. गुरुवारी श्रमीक स्पेशल ट्रेनमधून 1400 कामगार उत्तर प्रदेशला रवाना झाले. यामध्ये धारावीचे 1100 कामगारांपैकी 700 कामगार हे धोरवाडा, मुकुंद नगर, काला किल्ला, 90 फीट रोड,इदिरा नगर, पीएमजी कॉलनी, राजीव गांधी नगर,ट्रान्सीट कँप या कंटेंन्टमेंट झोनमध्ये राहतात. धारावीमध्ये 24 हाय रीस्क झोन आहेत.

धारावी 

  • कोरोना रुग्णांची संख्या-  1145
  • मृतांची संख्या- 53
  • कंटेन्टमेंट झोनची संख्या-24

या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या हालचालींवर पालिकेचे बारीक लक्ष आहे. मात्र ज्यांना गावी जायचंय त्यांना पालिका अडवू शकत नाही, मात्र जोपर्यत हे भाग कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत या कामगारांना इथ परत येता येणार नाही.अशी माहिती जी- नॉर्थचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली. या सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी झाली, कुठलेही लक्षणे आढऴून न आलेल्यांनाच प्रवासाची परवानगी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यापुर्वी या नागरिकांना प्रवास करायचा असेल तर पालिका कार्यालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होते. मात्र आता ती अट रद्द करण्यात आली असून, त्यांच्या प्रवासाची परवानगी देण्याची संपुर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे.असही  दिघावकर यांनी स्पष्ट केले. 

दूसरिकडे हाय रिस्कमध्ये राहणाऱ्या मात्र कोरोनाची कुठलेही लक्षणे नसलेल्या कामगारांना रेल्वे प्रवासाची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र त्यासाठी संबधित राज्यांची परवानगी आवश्यक आहे. अशी माहिती मुंबई पोलिस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली.

कोरोना पसरण्याची भिती 

मात्र सध्या कोरोनाची कुठलेही लक्षण नसलेले हे कामगार पुढे जाऊन कोरोनाचे वाहक ठरु शकतात अशा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. मुंबईत सुरुवातील कोरोनाची कुठलेही  लक्षणे नसणारे काही दिवसाने कोरोना पॉझिटीव्ह निघण्याच्या अंसख्य केसेस आहेत. मात्र या कामगारांना त्यांच्या राज्यात 14 दिवस सक्तीने क्वारंटाईन केले पाहीजे. हाय रिस्क झोनमधील नागरिकांमधून कोरोना पसरण्याचा धोका अधिक आहे. असही तज्ञांचे म्हणणे आहे. 

migrant workers from dharavi are moving towards their natives this might bring second wave of corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com