स्थलांतरित पक्ष्यांमुळे "बर्ड फ्लू'चा धोका! पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा खबरदारीचा सल्ला

स्थलांतरित पक्ष्यांमुळे "बर्ड फ्लू'चा धोका! पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा खबरदारीचा सल्ला


मुंबई : राज्यात "बर्ड फ्लू'चा संसर्ग पोचलेला नाही. स्थलांतरित पक्ष्यांच्या माध्यमातून "बर्ड फ्लू'चा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्‍यक ती काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी सांगितले. 
राज्यात "बर्ड फ्लू'चा संसर्ग नसल्याचे पशु-पक्षी संवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश व केरळ राज्यात "बर्ड फ्लू'चा संसर्ग पसरला आहे; मात्र याचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. बाधित राज्यातून संसर्ग महाराष्ट्रात येऊ नये यासाठी येथील कोंबड्या किंवा इतर पक्षी महाराष्ट्रातच आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थलांतरित पक्ष्यांच्या माध्यमातून "बर्ड फ्लू'सारखा संसर्ग पसरण्याचा धोका नाकारता येणार नसल्याचे डॉ. अजित रानडे यांनी सांगितले. 

जसबीन कुक्कू म्हणजेच चातक पक्षी आहे. हा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतो. हे पक्षी परदेशी साऊथ आफ्रिका येथून 15 ते 30 मेदरम्यान प्रवास करत भारतात स्थलांतरित होतात. हे पक्षी स्वतः आपली घरटी तयार करत नाही. हे पक्षी इतरांच्या घरट्यामध्ये आपल्या अंडी देतात. अशा पक्ष्यांच्या माध्यमातून संसर्गाची शक्‍यता आहे. फ्लेमिंगोसारखे पक्षी राज्यातील वेगवेगळ्या भागात दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचा प्रवास ऑस्ट्रेलियातून अफगाणिस्तान, पाकिस्तान, गुजरात, महाराष्ट्र असा होत असतो. अशा स्थलांतरित पक्ष्यांच्या माध्यमातून संसर्ग येण्याची शक्‍यता असते.

"बर्ड फ्लू'चा संसर्ग पसरू नये यासाठी सरकारने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत असल्याचेही डॉ. रानडे यांनी सांगितले. "बर्ड फ्लू' हा आजार पक्ष्यांमधून माणसांना होत नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचेही डॉ. रानडे यांनी सांगितले. आपल्याला हा आजार नवीन नाही. त्यामुळे त्याचा सामना कसा करायचा हे माहीत आहे; शिवाय आपल्याकडे अधिक स्वच्छता असून, कोरोनामुळे आपण योग्य ती काळजी घेत असल्याचेही ते पुढे म्हणाले. 

बर्ड फ्लूचे बहुतेक प्रकार प्रामुख्याने संक्रमित पक्ष्यांच्या श्‍वसन आणि लैंगिकदृष्ट्या कार्यशील मुलखांमध्ये आढळतात. बाधित पक्षी फार दूरचा प्रवास करण्याची शक्‍यता फारच कमी आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मानवांमध्ये "बर्ड फ्लू'चा संसर्ग फारच दुर्मिळ आहे. आपण काळजी घेणे महत्त्वाचे आहे. योग्यप्रकारे शिजवलेले चिकन आणि इतर कुक्कुट खाणे सुरक्षित आहे. 
- अनम गोलंदाज,
आहारतज्ज्ञ, मसिना रुग्णालय 

Migratory birds at risk of bird flu Veterinary experts warn 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com