'वर्क फ्रॉम होम'मुळे दुधाच्या मागणीत दुपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बहुतांश शासकीय, खासगी अधिकारी, कर्मचारी घरूनच काम करीत असल्यामुळे दिवसभर लागणाऱ्या चहा, कॉफीमुळे दुधाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बहुतांश शासकीय, खासगी अधिकारी, कर्मचारी घरूनच काम करीत असल्यामुळे दिवसभर लागणाऱ्या चहा, कॉफीमुळे दुधाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ही बातमी वाचली का? दिव्यांगाचे बाणेदार उत्तर... माझ्यापेक्षा गरिबांना मदत करा

खारघर सेक्टर सात, दहा, सोळा, अठरा, वीस, एकवीस आणि ३४ ते ३६ परिसर हा उचभ्रू आणि टॉवरमय परिसर म्हणून ओळखला जातो. परिसरातील बहुतांश नागरिक हे शासकीय, खासगी कार्यालय आणि कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. काहींच्या छोट्या-मोठ्या कंपनी आणि उद्योगधंदे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आल्यामुळे बहुतांश नागरिक घरूनच काम करीत आहेत. काम करताना दिवसातून तीन ते चार वेळा चहा तसेच शाळेला सुट्टी पडल्यामुळे मुलेही घरी आहेत. त्यामुळे दोन लिटरच्या जागी चार लिटर दूध लागत असल्याने दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. काही दूध डेअरीमध्ये विचारणा केली असता, पूर्वीपेक्षा अधिक दुधाच्या मागणीत वाढ झाल्याचे सांगितले.

ही बातमी वाचली का? झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना

चाळीस घरे असलेल्या सोसायटीत पूर्वी दैनंदिन सत्तर ते ऐंशी लिटर दुधाची मागणी होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक घरीच असल्याने जवळपास दीडशे लिटर दूध घरपोच द्यावे लागत आहे.
- दूध वितरक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk demand doubled due to 'work from home'