esakal | International Films : मराठी सिनेमांबाबत अमित देशमुखांचे मोठं विधान, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Deshmukh

International Films : मराठी सिनेमांबाबत अमित देशमुखांचे मोठं विधान, म्हणाले...

sakal_logo
By
- संतोष भिंगार्डे

मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Goa Film Festival) गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे (Marathi Movie) सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहेत. येत्या सप्टेंबर ते नोव्हेंबर 2021 काळात आयोजित करण्यात येणाऱ्या बर्लिन, व्हेनिस, टोरँटो, सनडान्स, न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात (Movie Festival) मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmuhk) यांनी सांगितले. (Minister Amit Deshmukh takes initiative about Marathi Films to be flash in International Film Festival-nss91)

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादितच्या संचालक मंडळाची 157 वी बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य आणि महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: गणेश मूर्तिकारांवर आर्थिक संकट, सरकारच्या नियमावलीमुळे उपासमार!

देशमुख म्हणाले की, मराठी चित्रपटांना व्यापक जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला जावा यासाठी सर्वोत्तम मराठी सिनेमे येणाऱ्या काळात वेगवेगळया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामील करण्यात येणार आहेत. आगामी काळात नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या फिल्मबाजार अंतर्गत सर्वोत्तम 10 मराठी चित्रपटांना पाठविण्यात येणार आहे. याशिवाय महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

कान्स 2021 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कडूगोड आणि मी वसंतराव या दोन सिनेमांची निवड करण्यात आली होती. आज झालेल्या बैठकीत या दोन्ही चित्रपटांच्या निवडीबद्दल संबंधित संस्थेचे निर्माते/दिग्दर्शक/ कलाकार यांचे अभिनंदन या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकारी यांनी केले.

यावेळी चित्रनगरी परिसरातील चित्रीकरण स्थळे आणि कलागारे यांचे भाडेतत्वावर आरक्षण देताना मेकअपरुप साहित्य पॅकेजनुसार निर्मिती संस्थांना उपलब्धस करुन देणे, कोविडमुळे पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम राबविणे, महामंडळस्तरावर महामंडळाचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत योजना राबविणे, वित्तीय वर्ष 2020-21 चे वार्षिक लेखे व संचालक मंडळाचा अहवाल मंजूर करणे, अशा मुद्दयांवरही चर्चा यावेळी करण्यात आली.

loading image