Maharashtra Government : ‘नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामे करा’ : मंत्री मकरंद जाधव पाटील
Crop Damage : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई : ‘‘राज्यात गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत,’’ असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील सर्व यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.