शेवटच्या वर्षाच्या परीक्षांबाबत UGC ने नवीन नियमावली दिल्यानंतर मंत्री उदय सामंत म्हणतात, झालेले सर्व निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्यातील शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातील संभ्रम कायम आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्यातील शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातील संभ्रम कायम आहे. UGC ने काढलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनतंर विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढलाय. या सर्व प्राश्वभूमीवर भाष्य करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरकारने या आधीच शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात सरकारने कुणा-कुणाशी काय चर्चा केली याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीये. 

विद्यार्थ्यांना आणखी किती दिवस संभ्रमात ठेवायचा हा प्रश्न उपस्थित करत मंत्री उदय सामंत यांनी UGC ने काढलेल्या नवीन गाईडलाईन्सवर टीका केलीये. या संदर्भात १३ कुलगुरूंशी संवाद साधला गेलाय. सोबतच राज्य सरकारने जो परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलाय तो केंद्राला सूचित करूनच घेतला असल्याचंही सांगितलंय. 

BIG NEWS - अजित पवार आणि संभाजी राजेंच्या बैठकीत तात्काळ झाला 'हा' मोठा निर्णय...

काय म्हणालेत उदय सामंत : 

  • 3 जुलैला  कुलगुरूंची पुन्हा बैठक झाली. त्यात सर्व कुलगुरूंनी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं सांगितले होते
  • ATKT संदर्भात सरासरी काढून विद्यार्थी पास होत नसतील तरी कोविडची परिस्थिती पाहून अशा विद्यार्थ्यांना पास करावं अशी शिफारस केली आहे
  • ATKT ची परीक्षा घेऊ नये अशीही शिफारस करण्यात आली आहे
  • महाराष्ट्रात कोव्हिडची परिस्थिती पाहता सप्टेंबरपर्यन्त परीक्षा घेता येणार नाहीत असं आम्ही युजीसीला कळवलं होतं. 
  • 17 मे रोजी राज्याने UGC ला पत्र लिहिलं होतं. त्याला तरी उत्तर दिलं असतं आतापर्यंत तर संभ्रम दूर झाला असता
  • परीक्षा कशा घ्यायच्या त्याबाबत UGC ने गाईडलाईन दिल्या पाहिजे
  • आम्ही आम्ही कुलगुरू यांच ऐकतो
  • 34 लाख विद्यार्थ्यापैकी 25 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटला आहे
  • शेवटच्या वर्षातील साडेआठ लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं विनंती करणार आहोत

minister uday samant on UGCs revised guideline and final year exams

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister uday samant on UGCs revised guideline and final year exams