esakal | इंग्रजी शाळा संस्थाचालकांची शिक्षणमंत्री हटाव मोहीम; लाखो पालकांचा पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

इंग्रजी शाळा संस्थाचालकांची शिक्षणमंत्री हटाव मोहीम; लाखो पालकांचा पाठिंबा

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी शाळा (Private School) मोठ्या आर्थिक संकटात (Financial Problems) सापडल्या असताना त्यासाठी कोणत्याही उपाययोजना, मदत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी केली नसल्याने त्याविरोधात राज्यातील इंग्रजी शाळा संस्थाचालकांनी त्यांना मंत्रीपदावरून हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. तर दुसरीकडे इंडिया वाईड पॅरेण्ट असोसिएशनने सोशल मीडियावर(Social Media) वर्षा गायकवाड यांना हटविण्याची मोहीम काही दिवसांपासून सुरू केली असून त्याला राज्यातील लाखो पालकांनी पाठिंबा(Parents Support) दर्शविला आहे.( Minister Varsha Gaikwad ministry removing demand parents supported-nss91)

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनकडून राज्यभरात शिक्षणमंत्री हटाव मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी दिली. वर्षा गायकवाड यांना मंत्रीपदावरून हटवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा तालुका पातळीवर असोसिएशनच्यावतीने लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. खाजगी शाळांचा फी प्रश्न अद्याप सुटलेला नाही, आरटीई प्रवेशासाठी मिळणारा फीचा परतावादेखील निम्म्याने कमी करण्यात आला आहे. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री सपशेल अपयशी ठरल्या असल्याचा आरोप तायडे-पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा: परमबीर सिंग यांच्यासह 8 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रातील एकाही अनुदानित अथवा सरकारी शाळेत ऑनलाईन शिक्षण सुरू नाही. 25 टक्के फी माफी करुन देखील उर्वरित 75 टक्के फी भरण्यासाठी अजूनही पालक तयार नाहीत, ते संभ्रमात पडले आहेत कि, ही राहीलेली फि सरकार देणार आहे की, आपण द्यायची, फि ची सक्ती करू नये, अशी घोषणा करुन शिक्षणमंत्री मोकळे झाले, परंतु आता पालकांनी हात वर केले, यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण मंत्री पुढाकार घेत नाहीत, असा आरोप असोसिएशनचे संजयराव तायडे पाटील यांनी केला आहे.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांचा आरटीई परतावा गेल्या चार वर्षांपासून सरकारने दिला नाही, त्यातच आरटीई परतावा 17,670 वरुन या वर्षापासून 8 हजार केला आहे. इंग्रजी शाळा शिक्षकांनी कसे जगावे? शाळा कशा जगवायच्या? शाळा जर जगल्या नाहीत तर त्या निरागस विद्यार्थ्यांचे काय होणार ? शिक्षण विभाग त्यांची जबाबदारी पेलावण्यास समर्थ आहे का? असा सवाल असोसिएशनच्यावतीने करण्यात आला. तसेच जोपर्यंत शालेय शिक्षणमंत्री पदावरून वर्षा गायकवाड यांची हकालपट्टी केली जाणार नाही तोपर्यंत राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन सुरूच राहील असा इशाराही असोसिएशनकडून देण्यात आला आहे.

loading image