मुंबईकरांनो लोकल सेवा सुरु करण्याबाबत महत्त्वाची बातमी, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

कुलदीप घायवट
Friday, 25 December 2020

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वसामान्यासाठी लोकल सेवा सुरू करण्याचे अद्याप कोणतेही अधिकृत पत्र आले नाही.

मुंबई : लोकल सेवा सुरू करणे, कोरोनावर आहे. कोरोना आटोक्यात आल्यावर परिस्थितीचा अंदाज घेण्यात येईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून लोकल सेवा जानेवारी महिन्यात सुरू करण्याचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर लोकल सुरू करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.त्यामुळे नववर्षात लोकलसेवा सुरू करण्याचा मुहूर्त टळणार आहे.

मागील नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी नाही. त्यामुळे प्रवाशांना लोकल सेवा कधी सूरु होईल, याची उत्कंठा लागून राहिली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून पुन्हा सुरू होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मात्र आता, कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यावर लोकल सेवा सुरू होईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी : आलिया भट आणि रणबीर कपूर केंव्हा अडकणार लग्नाच्या बेडीत? रणबीरने केला खुलासा

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वसामान्यासाठी लोकल सेवा सुरू करण्याचे अद्याप कोणतेही अधिकृत पत्र आले नाही. राज्य सरकारकडून ज्या ज्या क्षेत्रातील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देत आहे. त्याच्यासाठी लोकल प्रवास सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

लॉकडाऊननंतर जवळपास सर्वच क्षेत्रे खुली झाली आहेत. मात्र तरी मुंबई लोकल ट्रेन अद्याप सर्वांसाठी खुली झालेली नाही. त्यामुळे चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकलअभावी पर्यायी  वाहतूक सेवांवर ताण येत आहे. त्यातून फिजिकल डिस्टन्सचा प्रश्नही निर्माण होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा | Marathi news from Mumbai  

( संपादन - सुमित बागुल )

minister vijay wadettiwar on when mumbai local train will start for common man


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister vijay wadettiwar on when mumbai local train will start for common man