Dombivali Crime : होळी खेळताना फुगा लागला म्हणून अल्पवयीन मुलावर हल्ला

अंगावर रंगाचा फुगा पडल्यामुळे संताप झालेला तरुणाने फुगा फेकणाऱ्या अल्पवयीन मुलाला जाब विचारत केली बेदम मारहाण.
Beating
Beatingsakal
Updated on

डोंबिवली - अंगावर रंगाचा फुगा पडल्यामुळे संताप झालेला तरुणाने फुगा फेकणाऱ्या अल्पवयीन मुलाला जाब विचारत बेदम मारहाण करून त्याच्यावर धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

डोंबिवली पूर्वेतील सागाव परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या प्रणय जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार डोंबिवली पूर्वेतील मानपाडा सागाव येथील यशवंत कॉम्पलेक्स भागात गुरुवारी रात्री 8.30 वाजता सोसायटी आणि परिसरातील मुले होळीनिमित्त रंगाचे फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत होती.

यावेळी तक्रारदार 17 वर्षीय मुलाकडून रंगाचा एक फुगा बाजुला उभ्या असलेल्या तरूणाच्या अंगावर पडला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रणयने फुगा फेकणाऱ्या अल्पवयीन मुलाला जाब विचारत त्याला शिवीगाळ केली. तसेच त्याला मारहाण करत बाजूच्या अंधारात नेऊन त्याच्यावर धारदार वस्तुने हल्ला केला.

यात 17 वर्षीय मुलाच्या हातावर जखम झाली आहे. घडला प्रकार अल्पवयीन मुलाने घरी जाऊन सांगितला असता, या मुलाच्या पालकांच्या सुचनेवरून अल्पवयीने मुलाने मारहाण, हल्ला करणाऱ्या प्रणय यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com