esakal | भाईंदर : अभियंता गोळीबर प्रकरणी कर्मचार्‍यांचे आंदोलन | Bhayandar
sakal

बोलून बातमी शोधा

gun firing

भाईंदर : अभियंता गोळीबर प्रकरणी कर्मचार्‍यांचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेचे (Mira-Bhyandar municipal) कार्यकारी अभियंता दीपक खांबित (dipak khambit) यांच्यावर बुधवारी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा निषेध करत महापालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन (employee strike) केले. दीपक खांबित बुधवारी सायंकाळी घरी परत जात असताना मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीक त्यांच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार (Firing) केला होता.

हेही वाचा: BMC : तीन सदस्यीय प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान

या हल्ल्यात खांबित थोडक्यात बचावले. या घटनेचा मिरा भाईंदर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवत आंदोलन केले. काळ्या फिती बांधलेले अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने महापालिका मुख्यालयाबाहेर जमा झाले होते. हल्लेखोरांना तातडीने पकडण्यात यावे, या मागणीसाठी अधिकारी कर्मचाऱ्‍यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त दिलीप ढोले तसेच पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले.

loading image
go to top