esakal | डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ द्या; महापौरांचे प्रशासनाला आदेश | Mira bhayandar municipal
sakal

बोलून बातमी शोधा

mira bhayandar municiple corporation

डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ द्या; महापौरांचे प्रशासनाला आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : पदोन्नतीपासून (promotion) वर्षानुवर्षे वंचित असलेल्या मिरा-भाईंदर पालिकेतील (Mira-bhayandar municipal) कर्मचाऱ्यांना येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, असे आदेश महापौर ज्योत्स्ना हसनाळे ( jyotsna hasnale) यांनी प्रशासनाला दिले आहेत. पदोन्नतीच्या विषयावरून कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने (sakal news) प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी या विषयावर विशेष बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

हेही वाचा: भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा

पदोन्नतीच्या मार्गात अडथळा निर्माण करत असल्याच्या रागातून दोन कनिष्ठ अभियंत्यांनी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यानिमित्ताने महापालिकेतील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पदोन्नतीच्या विषयाला पुन्हा एकदा वाचा फुटली. या विषयावरील सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी पदोन्नतीच्या विषयावर अधिकारी आणि कर्मचारी यांची विशेष बैठक बोलावली होती.

या वेळी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका, बिंदू नामावली, सेवाज्येष्ठता, सेवा प्रवेश नियम, आकृतिबंध आदी मुद्द्यांचे पालनच केले नसल्याची खंत कर्मचाऱ्‍यांनी महापौरांकडे व्यक्त केली. प्रशासनाने वेळेवर पदोन्नती न केल्याचा फटका अनेक कर्मचऱ्यांना बसला आहे. अनेक कर्मचारी विशिष्ट पदासाठी लायक असतानाही प्रशासनाकडून पदोन्नतीच देण्यात आली नाही. परिणामी अनेक कर्मचारी त्याच्या वरिष्ठ पदावर जाऊ शकलेले नाही, तर वर्ग तीनच्या कर्मचऱ्यांनाही वेळीच पदोन्नती न दिल्याने आज ते केवळ नियमातील तरतुदीमुळे सहायक आयुक्त, उपायुक्तपदावर जाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती कर्मचऱ्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली.

"कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील असंतोष दूर करून त्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत पदोन्नती देण्यात यावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत."
- ज्योत्स्ना हसनाळे, महापौर

loading image
go to top