भाजपबाहेर असलेल्या नरेंद्र मेहतांची भाजपवर पकड?

वाचा, मीरा-भाईंदरच्या भाजपचा 'व्यास' कमी होणार?
भाजपबाहेर असलेल्या नरेंद्र मेहतांची भाजपवर पकड?

विरार: मीरा भाईंदरमध्ये एक काळ होता जेव्हा दोन्ही काँग्रेस मीरा भाईंदरवर राज्य करत होते. परंतु नरेंद्र मेहता यांच्या उदयानंतर मात्र येथील राजकीय समीकरणं बदलली आणि त्यांनी पालिकेवर आपले वर्चस्व स्थापन केले. आज नरेंद्र मेहता भाजपाच्या परिघाबाहेर असले, तरी आजही भाजपमध्ये त्यांचाच दबदबा असल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या विरोधी गटातील रवी व्यास यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर मेहता गटातील जवळपास ५० नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले. मंगळवारी थेट भाजपच्या प्रदेश कार्यालयावर जाऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपचा राजकीय 'व्यास' कमी होणार कि 'व्यास'च परिघाबाहेर जाणार, याची सध्या चर्चा आहे. (Mira Bhayander BJP Internal Politics Narendra Mehta vs Ravi Vyas Fight Analysis by E Sakal)

भाजपबाहेर असलेल्या नरेंद्र मेहतांची भाजपवर पकड?
नवी मुंबईतून पुणे-मुंबईकडे जाताय? वाहतुकीतील बदल समजून घ्या

मीरा भाईंदर मध्ये भाजप म्हणजेच नरेंद्र मेहता आणि नरेंद्र मेहता म्हणजेच भाजप असे समीकरण नरेंद्र मेहता यांच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजप सोडला असला तरी आज हि त्यांचेच वर्चस्व मीरा पालिकेवर असल्याचे दिसून येत आहे. मीरा भाईंदर मध्ये नरेंद्र मेहता यांचा उदय झाल्यानंतर त्यांनी भाजप मध्ये पहिल्यांदा स्व. गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला तर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हात दिला. तो हात त्यांनी अजूनही सोडलेला नाही त्यामुळेच काल प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत दादा पाटील यांनी हेमंत म्हात्रे यांच्या जागी अध्यक्ष म्हणून नरेंद्र मेहता यांच्या विरोधी गटातील रवी व्यास यांच्या नावाची घोषणा केल्यावर नरेंद्र मेहता पहिली धाव घेतली ती माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे. या समर्थकांना दोन दिवस थांबण्याचा सल्ला त्यांनी दिला असून आता सारे लक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या निर्णया कडे लागून राहिले आहे.

भाजपबाहेर असलेल्या नरेंद्र मेहतांची भाजपवर पकड?
'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

जर रवी व्यास यांना अध्यक्षपदावरून न हटवल्यास राजीनामा अस्त्र मेहता समर्थकांनी बाहेर काढल्याने यावर भाजप मध्ये मोठे चिंतन सुरु झाले आहे. एक तर राज्यातील सत्ता गेली असताना आता सत्ता एका अध्यक्षपदावरून जाऊ नये यासाठी प्रदेश नेतृत्वाला विचार करावा लागणार आहे. सद्या तरी रवी व्यास यांच्या बरोबर जास्त नगरसेवक नसल्याने त्यांना बाजूला केल्यास तेवढा फटका बसणार नाही असे बोलले जात आहे. परंतु अध्यक्ष न हटविल्यास येथील सत्ता मात्र हातची जाण्याचा धोका असल्याने आता भाजप नेतृत्व काय निर्णय घेते या कडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे त्यातच पुढच्यावर्षी पालिकेच्या निवडणुका हि होणार असल्याने नरेंद्र मेहतांना पेक्षा त्यांना गोंजारनेच भाजपच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे यावेळी हि ९५ नगरसेविका पैकी भाजपचे ६१ नगरसेवक निवडून आणण्यात नरेंद्र मेहता यांचे योगदान महत्वाचे होते.

भाजपबाहेर असलेल्या नरेंद्र मेहतांची भाजपवर पकड?
विमानतळाचा वाद चिघळणार? नवी मुंबईत मोठा पोलिस बंदोबस्त

आजही नरेंद्र मेहता यांना आव्हान देणार नेतृत्व भाजपकडे नाही. आमदार गीता जैन या भाजपला सोडून शिवसेनेच्या सहयोगी सदस्य झाल्याने आणि हेमंत म्हात्रे यांना पदावरून हटविण्यात आले. आता भाजपला रवी व्यास यांनाही हटवण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याने पुन्हा एकदा मीरा भाईंदर भाजपवर नरेंद्र मेहता वर्चस्व असल्याचे दिसून येणार आहे. त्यातच ७ जुलैला मेहता यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा मेहता यांची भाजप मध्ये घरवापसी होण्याचे संकेत मिळत असून त्यांना आता थेट प्रदेशवर घेण्याच्या हालचाली सुरु असल्याने मीरा भाईंदर भाजप म्हणजेच नरेंद्र मेहता आणि नरेंद्र मेहता म्हणजेच भाजप असे समीकरण पुढे येते की काय, अशी चर्चा सुरू आहे. तसेच, प्रदेश नेतृत्व काही दिवसांतच आपला निर्णय फिरवते का? हेदेखील बघणे महत्त्वाचे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com